Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत कार्य ; निर्माल्याचे केले विघटन
    जळगाव

    रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत कार्य ; निर्माल्याचे केले विघटन

    SaimatBy SaimatSeptember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट क्लबच्या विध्यार्थ्यातर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य संकलन व विघटन’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले.

    गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले, दुर्वा, फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून या उपक्रमामुळे निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक हे, बरोबर आणलेली व पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्या, कापूर सोबत आणून विसर्जन स्थळीच वाहतात. त्यामुळे हे जलप्रदूषण रोखण्यासाठी या सर्व संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येत असून तयार केलेले खत हे रोपवाटिकेसाठी वापरले जाते.

    हा उपक्रम राजेश्वरी पवार, जयश्री पवार, कल्पेश महाजन, संदेश गवळी, यश जैन, निशांत कदम, निखील मिस्त्री, सिद्धेश अहिरे, अक्षय गवई, ललित पाटील, जयेश राठोड, हेमंत कोळी, हेमंत चौधरी, दिव्या जैन, सैजल परदेशी, प्रियांका शर्मा, सैजल बाहेती, दिव्या छाजेड, अक्षय घुगे, सुशांत लोहार आदी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी राबविला. कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तर प्रा. विशाल राणा, प्रा. मुकेश अहिरराव, प्रा. अश्विनी बोंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026

    Varangaon : वरणगाव रस्त्यावर मालवाहू गाडी जळून खाक

    March 23, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.