साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज अशा चौकोनातून कार्य करणारी आणि सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा यांच्या विविधांगी विकासासाठी कार्य करणारी ‘समृद्धी शिक्षक फाउंडेशन’ अशा नोंदणीकृत संस्थेची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष तथा उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी होते.
कार्यकारिणीत उपक्रमशील शिक्षकांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी संस्थेची ध्येय, उद्दिष्टे, भविष्यातील विद्यार्थी विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगून नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सतीश सतीश सूर्यवंशी, उपाध्यक्ष कामिनी योगेश पाटील, सचिव दिनेश कृष्णाजी चव्हाण, सहसचिव महेंद्र शिवलाल पवार, कोषाध्यक्षा नितादेवी शेषराव चव्हाण, कार्याध्यक्ष चंद्रकांत वसंतराव ठाकरे तर संचालकांमध्ये जामराव नामदेव पाटील, सोमनाथ शंकर चौधरी, दिनेश अशोक मोरे यांचा समावेश आहे. यावेळी विविध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.