स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
तालुक्यातील दुधलगाव बु. येथील जीवन विकास विद्यालयातील २०१० मधील इयत्ता दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन तब्बल १४ वर्षांनंतर भेट झाली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शाम नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नाफडे, श्री.शिरसाट, एन. डी. नारखेडे, श्री.चोपडे, लिपिक पाटील तसेच कर्मचारी निनाभाऊ पाटील, रामभाऊ धाडे, पिंटूभाऊ ठोसर उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक शाम नारखेडे यांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी राहण्यासाठी मित्र किती महत्त्वाचे आहेत, यावर आपले विचार व्यक्त केले. इतर उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळावा कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
मेळाव्यात यांची लाभली उपस्थिती
मेळाव्यात विद्यार्थी नविल वाघ, प्रफुल गोरे, गजानन वराडे, आधारसिंग चव्हाण, अमोल उमाळे, सागर चौधरी, गजानन इंगळे, आश्विन कोलते, अक्षय खर्चे, गजेंद्र नारखेडे, प्रफुल्ल खराटे, संजय बावस्कर, मंगेश गावंडे, श्रीकांत राखोंडे, दीपक पाटील, ऋषिकेश पाटील, आकाश महाले, मारोती चवरे, किसन वाघ, जीवन इंगळे, निना नारखेडे, अनिल बावस्कर, संदीप महाले उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नारखेडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.