‘भाऊंच्या’ वाढदिवसानिमित्त आग्रहाची अन् प्रेमाची साद
जळगाव जिल्ह्यात राजकीय, सामाजिक, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात वावरणाऱ्या वाघ कुटुंबियांना कै.आप्पासाहेब ओंकार वाघ यांचा समर्थ आणि कृतिशील असा वारसा आहे. कै.आप्पा साहेबांच्या हयातीतच दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या परिसरात धडाडीने नेतृत्व करायला सुरुवात केली. सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण, बेरोजगार वेळोवेळी निर्माण होणाऱ्या मतदारसंघातील समस्या, दुष्काळ, अन्याय, अत्याचार अशी फार मोठी भाऊंच्या जनहिताच्या कामाची जंत्री आहे. ते सदैव जनतेबरोबर राहिले आणि त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आघाडीवर राहून नेतृत्व करत राहिले. अशी कोणतीही सहकार अथवा राजकीय क्षेत्रातील निवडणूक नाही की, ज्या निवडणुकीत निष्ठावान योग्य आणि कृतिशील कार्यकर्त्यांना संधी मिळवून देण्यासाठी ते स्वतः झटले नाहीत. सातत्याने कार्यकर्त्यांना आणि जनतेला न्याय देण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.
गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी श्री. वाघ आपल्या आयुष्याची ५८ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीस असंख्य कार्यकर्त्यांनी मित्र परिवार विविध क्षेत्रातल्या सहकाऱ्यांनी आयुष्याच्या वाटचालीत त्यांना साथ दिली. त्या सर्वांना उपस्थितीचे नम्र आवाहन करीत आहोत.
विधानसभेची निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. १९७२ चा अपवाद सोडला तर गेल्या ७० वर्षात झालेल्या विधानसभेच्या सर्व निवडणुका कै. आप्पासाहेब आणि दिलीपभाऊ आपल्या कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि तमाम प्रेमी जनतेच्या सहकार्याने जय – पराजयाची चिंता न करता निवडणुकांना सामोरे गेले आहेत. आज तीच वेळ आली आहे. पैशाच्या बळावर राजकारण करणाऱ्या आणि सत्तेची स्वप्न रंगवणाऱ्या उमेदवारांचे सध्या पेव फुटले आहे. जनतेच्या समस्या काय असतात. वेळोवेळी लोकांवर कोणत्या प्रकारची संकटे येतात. अडीअडचणी आणि संकटांच्या निवारणासाठी धावून जावे लागते. या गोष्टींची ज्यांना राजकीय जीवनात तसूभरही जाणीव नाही, अशी काही मंडळी येणाऱ्या काळात आपल्यासमोर विधानसभेसाठी मत मागायला येतील.
लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांनी जरूर निवडणूका लढवाव्या. मात्र, विचार आपल्याला करायचा आहे. मतांची विभागणी करण्यासाठी असे उमेदवार उभे करायचे प्रकार सर्वच निवडणुकांमध्ये होत असतात. ही विभागणी टाळण्यासाठी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून आपल्याला शक्य होईल तितके सहकार्य करावे. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आग्रहाची आणि प्रेमाची साद घालत आहोत.
– माजी आ. दिलीपभाऊ वाघ अभिष्टचिंतन सोहळा स्वागत समिती