साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
येथील प्रभाकर कला संगीत अकॅडमीतर्फे दर वर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त यंदा आद्यंत या अनादि से आधुनिक तक या संकल्पनेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमातून परंपरा आणि नाविन्याचा मिलाफ सादर करण्यात आला.
ला. ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या आणि व. वा. जिल्हा वाचनालय सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात डॉ. प्रदीप जोशी, ॲड. सुशील अत्रे, सी.ए.अनिलकुमार शाह व संस्थापिका डॉ.अपर्णा भट यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.प्रदीप जोशी यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी श्रीकृष्ण पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कृष्ण भजन, सरस्वती वंदनाने झाली. यानंतर अर्धांग, थुंका थुंका व शक्ती स्तुतीचे सादरीकरण करण्यात आले. ठुमरी, तराना व अष्टपदी विद्यार्थिनींनी सादर केली. गुरुवंदने नंतर धीर धीर आये, बालम वा आणि तराना सादरीकरण झाले. उत्तरार्धात मोरी चुनरिया, तुम संग नैना व आयो बलमा या गीतांवर नृत्याचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमात कोमल चव्हाण, संज्योत दीक्षित, हेतल चव्हाण, अवनी गुजराती, ऋतुजा महाजन, रिद्धी जैन, दीपिका घैसास, वाडमयी देव, मधुरा इंगळे, रिद्धी सोनवणे, तेजस्विनी क्षीरसागर , स्वानंदी बोरसे, जान्हवी पाटील, सिद्धी राणे, आनंदी याज्ञिक, संस्कृती गवळे, समृद्धी डी. पाटील,वरदा तळेले, समृद्धी एम. पाटील, त्रिवेणी घारगे, यज्ञा मोरे या अकॅडमीच्या विद्यार्थिनींचा सादरीकरणात सहभाग होता.
कार्यक्रमाचे निवेदन डॉ. अपर्णा भट यांनी तर सूत्रसंचालन डॉ.प्रीती पाटील यांनी केले. अकॅडमीच्या विद्यार्थिनी हेतल चव्हाण व संज्योत दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले.आभार स्वानंदी बोरसे यांनी मानले.