साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
विद्याविहार कॉलनीतील भाविकांचे श्रध्दास्थान विद्येश्वर महादेव मंदिरात महादेव, नंदी, गणपती, दुर्गादेवी, राधाकृष्ण यांची स्थापना करण्यात आली. अमळनेर तालुक्यातील हे एकमेव मंदिर आहे. यासाठी अनेक भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दर्शनासह पूजा केली. सोमवारी, २८ रोजी बारा वाजता कळसाची स्थापना, होम हवन सकाळी ९ ते ११ वाजता झाली. मुर्तीची स्थापना ११ वाजता तर कळसाची स्थापना १२ वाजता करण्यात आली.
यावेळी महामंडलेश्वर स्वामी हसानंद तिर्थजी महाराज कपीलेश्वर मंदिर येथील महाराज यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. मंदिरात प्रवचन करण्यात आले. नंतर महादेव मंदिरातील पूजाअर्चा यासंदर्भात महामंडलेश्वर महाराज यांनी सखोल माहिती सांगितली. त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिंताबर पाटील यांनी सहपत्नीक केला तर होमहवनासाठी सात सहपत्नीक भाविक बसले होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी संजय पाटील, सुनील शिंगाणे, अशोक साळुंखे, राहुल शिंपी, अशोक जाधव, प्रवीण गुजर, सचिन शिंपी, मिलिंद वारूळे, कपील पाटील, राकेश गोसावी, राज वाणी, मधुकर देसाई, साहेबराव पाटील, वसंत पाटील, बापूगिर गोसावी, प्रा.देविदास जगताप, प्रवीण वाघ यांच्यासह विद्याविहार कॉलनीतील नागरिक, महिला यांनी परिश्रम घेतले.