साईमत जळगाव प्रतिनिधी
शिव कॉलनी परीसरातील गणपती मंदिर प्रांगणात श्री रुद्रेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मंदिराला कळस व ध्वजपूजन महामंडलेश्वर परमपूज्य इंद्रदेव स्वरा आनंद सरस्वती यांचे हस्ते झाले.
शिव कॉलनी परीसरात २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.या दहा दिवसात श्रीमद् भागवत कथा, भजन, कीर्तन, हरिपाठ, काकड आरती, सुंदर कांड, भोले बाबांचे गीते अश्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय वातावरणात नाऊन निघाला. दि. ५ जानेवारी रोजी बैलगाडीवर शिवलिंगाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मुख्य आकर्षण शंकरजींची सजीव आरास होती, झांज पथक, बँड रस्त्याच्या दुतर्फा डबल मजली रंगीबेरंगी आठ-आठ छत्र्या त्याचप्रमाणे कॉलनीतील सर्व महिलांनी फेटा बांधून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
यावेळी महाआरती व महाप्रसाद भंडारा कार्यक्रम झाला जवळपास ४ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण दगडी पाषाणात साकारलेल्या या महादेव मंदिर धार्मिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भावीकभक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन होते, तर प्रमुख पाहुणे आ. राजू मामा भोळे, सिंधू कोल्हे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेवक प्रा. सचिन पाटील , मनोज काळे , धर्मदाय आयुक्त मोहन गाडे, डॉ.सुरेश राणे , त्रिमूर्ती कॉलेजचे अध्यक्ष मनोज पाटील, ह. भ. प. वरसाळे महाराज, सदाशिवराव ढेकळे, ललित चोधरी, अमित काळे आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरुदत्त शिव कॉलनी विकास बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना बाविस्कर, रुद्रेश्वर महादेव मंदिर समिती अध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे, उपाध्यक्ष अनिता पाटील ,पांडुरंग बाविस्कर, सचिव चंद्रशेखर निकम , सुधाकर कापुरे, राजेश रेणुके, सर्जेराव सोनवणे, संचालक मंडळातील संभाजीराव शिंपी, मंगेश सोनार, प्रकाश बाविस्कर, मयूर पाटील , हरीष,चौधरी , दिनेश पाटील , नारायण कासार , सीमा झाल्टे , संध्या नेरपगारे , लक्ष्मण साळुंखे, दिनकर पाटील, निनाद शिंपी, एस. आर. पाटील, शामराव सोनगिरे, तुकाराम पाटील, भिकन जगताप , विजय पाटील, राजेंद्र सोनवणे, रामचंद्र पाटील, दीपक वाणी , रामू पाटील आदींसह महिला प्रतिनिधी कॉलनीवासी नागरिक आदींनी सहकार्य केले. या बारा दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मंगल बी. पाटील यांनी केले.
महादेव मंदिर समिती कार्यकारणीत पांडुरंग बाविस्कर, शामराव सोनगिरे, भरत पाटील, दिनकर पाटील, तुकाराम पाटील, जगदीश होले, निरंजन वाणी, दीपक वाणी, एस. आर. पाटील, निलेश पाटील, भिकन जगताप, विजय पाटील, राजेंद्र सोनवणे, रामचंद्र पाटील, भिकन हिवराळे, जितेंद्र वखरे, बि. व्ही. पवार, निनाद शिंपी, रामू पाटील, गणेश भाजीवाला, राजू पाटील, राजू मिस्तरी, सुनील पाटील, प्रभाकर सुपे, प्रशांत महाजन, शांताराम पाटील आदींचा समावेश आहे.