Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»Erandol Taluka Shaken : एरंडोल तालुका हादरला : चिमुकल्याचा खून ; नरबळीचा संशय
    एरंडोल

    Erandol Taluka Shaken : एरंडोल तालुका हादरला : चिमुकल्याचा खून ; नरबळीचा संशय

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तीन संशयितांना घेतले ताब्यात, एरंडोलला खुनाचा गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील अवघ्या १३ वर्षांच्या तेजस गजानन महाजन ह्याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली. खर्ची गावाजवळ त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा खून नरबळीच्या संशयातून झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस महाजन हा आपल्या आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील शेतीसोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तेजसचे वडील सोमवारी, १६ जून रोजी जळगावला कामासाठी गेले होते. त्यांनी तेजसला दुकानावर बसण्यास सांगितले होते. सायंकाळी दुकान बंद करून तेजस घरी येणार होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. नातेवाईकांनी तातडीने एरंडोल पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

    पोलिसांनी तेजसचा शोध सुरू केला. तेव्हा १७ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर तो मृतदेह बेपत्ता असलेल्या तेजस महाजनचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली

    घटनास्थळी तात्काळ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली होती. दरम्यान, हा खून नरबळीच्या संशयातून केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, चिमुकल्याची हत्या करण्यामागील कारण काय? याबाबतचा सखोल तपास पोलीस करत आहे. खुनाच्या घटनेमुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.