साईमत जळगाव प्रतिनिधी
अरुणाबाई कॉलेज ऑफ फार्मसी येथे एक सप्ताह कार्यशाळा आयोजीत केली होती. यामध्ये चतुर्थ वर्षातील बी फर्मसीच्या विद्यार्थ्यांनी यूव्ही, एचपीएलसी, जीसी आणि डिसॉल्यूशन अशी उपकरणे हाताळली.
फार्मस्युटीकल केमेस्ट्री विभाग वरिलायबल श्री इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून अनिल विसपुते होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी सरस्वतीपुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर अनिल विसपुते यांनी विद्यार्थ्यांना उपकरणांविषयी माहिती दिली. त्यानंतर चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी कुतूहलाने पुर्ण सप्ताहात विविध उपकरणे हाताळली.
कार्यशाळेच्या समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वप्नल नारखेडे यांनी केले. या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आर. जी. पाटील, सचिव अरुणामाई आर. पाटील व प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी कौतूक केले.