साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझी वसुंधरा अभियान ४.० च्या अनुषंगाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशातून महानगरपालिका व मानव सेवा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा मानव सेवा विद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सुबक अश्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. सदर कार्यशाळेचे आयोजन मानव सेवा विद्यालय जळगाव माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीराम सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया विलासचंद्र आंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता प्रमोद पाटील, शिक्षक अलका अनिल महाजन, रत्ना भागवत चोपडे, अनिल राजेश शिरसाठ, गिरीश हिरालाल जाधव तसेच महानगरपालिकेतर्फे योगेश वाणी पर्यावरण विभाग आदी मार्फत करण्यात आले होते. सदर उपक्रमास मूर्तिकार सुनील न्हानु दाभाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. माती पासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन देखील घरीच करावे याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.