लोहाऱ्यात रा.काँ.च्या शरद पवार गटात युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश

0
26

साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर

येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विस्तृत बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी लोहारा गावातील शेकडो सुशिक्षित तरुण, शेतकरी वर्ग शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त करत अनेक युवक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी जामनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी जि.प.सदस्य डिगंबर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, किशोर खोडपे, आशिष दामोदर, रुपेश पाटील, प्रल्हाद बोरसे, विश्‍वजीत पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या लोहारा अध्यक्षपदी प्रणेश भागवत क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.

लोहारा येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. इतर सर्व पक्षांचा अनुभव घेतल्यावर न्यायिक वागणूक न मिळाल्यामुळे सन्मानाचे राजकारण करण्यासाठी आपण प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासात शरद पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या विचारांवर विश्‍वास ठेवून तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी सर्व जाती-धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा एकमेव पक्ष सक्षम आहे. त्यासाठी सर्व युवक पक्षात प्रवेश करीत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी.के.पाटील यांनी सांगितले.

भाजपचा खरा चेहरा आता आपल्या समोर आला आहे. आपण भाजपला थारा देणार नाही, अश्‍या भावना गावातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. जगातील सर्वात मोठ्या तारुण्य असलेल्या देशात तरुणांना केंद्रबिंदू मानून जे सरकार काम करेल तोच पक्ष येत्या काळात टिकेल. कारण आजचा तरुणवर्ग फार सुशिक्षित आहे. सुजाण आणि भविष्याचा वेध घेणारा आहे. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, तरुण, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका संदर्भात चर्चा करून पक्षाचे ध्येय धोरणानुसार कार्य करून लोहारा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी कार्य करावे, अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

बैठकीला बापू देशमुख, शुभम चौधरी, शरद देशमुख, ईश्‍वर खरे, लोटू काळदाते, भावडू शृंगारे, बापू बाविस्कर, गफ्फार मिस्तरी, रज्जाक दादा, शेख इस्माईल शेख हुसेन, चांदखान पठाण, शेख उस्मान शेख रहमान, आनंदा सुरवाडे, राजेंद्र गोंधळे, अनिल भावराव पाटील, कडुबा भावराव देशमुख, भरत देशमुख, गजानन सरोदे, शुभम अंबिकार, नाना चौधरी, येशू शेळके, भैय्या कोळी, पंकज माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here