साईमत, जळगाव : प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात युवकांनी जिल्हा युवक, महिला आघाडी, महानगर कार्यकारिणीत अनिल चौधरी (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश सोहळा शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी राहुल कोळी, इसार तडवी, कावेरी भारती, राजेंद्र साहेबराव कुंवर, गणेश अप्पा साळी, परेश नेवे, मोहन कोळी (प्रहार जनशक्ती पक्ष युवक आघाडी, ता. चोपडा) सुशांत येवले, किरण जावळे, प्रल्हाद शिंपी, कृष्णल चौधरी, राहुल राणे, गौरव गालफाडे, सारंग पाटील, अश्विन कोळी, आकाश परदेशी, ज्ञानेश्वर साळुंखे, चेतन आहिरे, आदित्य संतोष जोशी, धीरज ढाके, यश पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी संभाजी सोनवणे (जिल्हाध्यक्ष, शेतकरी आघाडी, जळगाव), दिनेश कोळी (युवक जिल्हाध्यक्ष जळगाव), निता राणे (जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख), प्रवीण पाटील (महानगर अध्यक्ष, जळगाव), सतीश सपकाळे (युवक तालुकाध्यक्ष, जळगाव), दत्तू कोळी, अनुप मनोरे, मीना महाजन, नरेंद्र सपकाळे, लकी सूर्यवंशी, मनोज दमाले, माजीद अली, चेतन कोळी, राहुल इंगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.