जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत आयोजित उद्योजक मेळाव्यात सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. गिरीशभाऊ महाजन व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सुद्धा उद्योजकांना संबोधित करत त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व उद्योजकांनी महायुतीची उमेदवार व मा. नरेंद्रजी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामविकास मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन, मा. आमदार राजूमामा भोळे, उज्वलाताई बेंडाळे, अरुणदादा बोटोले, कवरलालजी संघवी, डॉ. राधेश्याम चौधरी, कांतीलालजी सानप, केतकीताई पाटील, सुनिलजी वेठ साहेब, रावजी लठा, समीरजी साने, संतोषजी रगडे, बंडूदादा काळे, चंद्रकांतदादा बेंगळे, अरविंदभाऊ देशमुख, किशोर ठाळे यांसोबत सर्व उद्योजक व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.