खेडी – इंदिरा नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
22

खेडी – इंदिरा नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री( गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या समन्वयाने आणि जय बजरंग मित्र मंडळ यांच्या सहकार्याने प्रभाग क्र. ३ मधील खेडी,इंदिरा नगर येथे  २८ सप्टेंबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास  परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरात विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक प्रवीण कोल्हे , भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा ,भाजपा महिला मोर्चा महानगर प्रमुख भारती सोनवणे, केमिस्ट असोसिएशनचे  सुनील भंगाळे यांनी सदिच्छा भेट दिली.

शिबिरात  सेवा देण्यासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाचे डॉ. रत्नेश जैन, स्त्रीरोग  विभागा, मेडिसिन विभाग, शल्य चिकित्सा विभागाचे डॉक्टर , परिचारिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here