Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»Paladhi : पाळधी येथे नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
    धरणगाव

    Paladhi : पाळधी येथे नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

    saimatBy saimatDecember 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Eye check up camp
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     ८१० रुग्णांची तपासणी; २३० मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

    साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :

    ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प.सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

    पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी ७ वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. पैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती. उपस्थित प्रत्येकासाठी नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. संपूर्ण सेवा विनामूल्य दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

    दृष्टीदान या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक रुग्णांनी व ज्येष्ठ नागरिकांनी नेत्यांचे आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कामात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

    शिबिर यशस्वीतेसाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी, डॉ विजय ब्राम्हणे, असद अन्वर, सायली उटेकर, वैशाली राऊत पाळधी व चांदसर आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.संजय चव्हाण, डॉ.निखील शिंदे, डॉ.ऋषिकेश झंवर, डॉ.प्रिती पाटील, संदीप पाटील, हर्ष भट, रिकुल चव्हाण तसेच जीपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

    जलपुरवठा क्षेत्रातील कार्यामुळे ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या नेत्यांची आता नागरिकांमध्ये ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणूनही नवी प्रतिमा तयार होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026

    Dharangaon : विदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन; दोन आरोपींना अटक

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.