साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. ज्याच्या हाती ससा तो पाळधी . अशी एकंदरीत परिस्थिती जी.प त पाहावयास मिळत आहे. प्रशासक नेमणुक झाल्या पासून जी.प सदस्य उपाध्यक्ष व अध्यक्ष ह्यांचा वावर जी.प त नसल्याने अधिकाऱ्यांना मन मर्जी कारभारासाठी फावले असल्याचे आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या दालनात कामे वाटपाट डावलल्याचे सांगत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनि एल्गार पुकारला मुले प्रत्यय आला . दरम्यान बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री धिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन ह्यांनी मात्र गुड गुडीत उत्तर दिल्याने बेरोजगार अभियंते ह्यांचा मोर्चा तब्बल चार तास जी.प च्या आवारात घोषणाबाजीने सुरु राहिला. एकंदरीत ह्या बेरोजगार अभियंत्यांनाही आता नियमानुसार कामे मिळणार असल्याचे समाधान तूर्त तरी मिळाले आहे.
जळगाव जी.प नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. प्रशासक लागल्यामुळे जी.प त अधिकारी मानमर्जीने कामे करीत असल्याचे आज पाहावयास मिळाले. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रेशो प्रमाणे कामे वाटप न करता एकाला अंगाशी एकाला टांगशी अशी भूमिका घेतल्यामुले तरुणांनी आज अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी ह्यांच्या दालनात एकत्रित एल्गार पुकारला. तब्बल दोन तास अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी ह्यांचा दालनात तर सीईओ न च्या कार्यालय समोर एक तास घोषणा बाजी देत आंदोलन सुरु राहिले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री धिवरे व अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री मोहन ह्यांनी नियमानुसार कामे मिळतील अशी ग्वाही दिल्याने प्रकरण शांत झाले आहे. ह्या वेळी ह्या आंदोलनात सुरज नारखेडे निलेश पाटील , पंकज वाघ , विद्युत सुशिक्षित बेरोजगार तरुण व पन्नास ते सत्तर सुशिक्षित बेरोजगार ह्यांनी मोर्चा घडवून आणला.
फैझपूर माजी नगराध्यक्ष श्री निलेश राणे ह्यांचाही दांगडो
बांधकाम विभागातील कामे वातपाचा महत्वाचा टेबल असलेले पी एम पाटील ह्यांनीच कामे वाटपात अफरातफर करीत प्रशासकीय साहित्य घरी घेऊन गेले असल्याचे तक्रार श्री निलेश राणे ( पिंटू राणे ) ह्यांनी केली आहे. ह्या प्रकरणी काय कार्यवाही केली जाते ह्या कडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.