Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली
    क्राईम

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    saimatBy saimatFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Malegaon: Elevator collapses in Malegaon Municipal Corporation
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     चौथ्या मजल्यावरून पडताना पहिल्या मजल्यावर अडकल्याने १८ जणांचे प्राण वाचले

    साईमत/मालेगाव/प्रतिनिधी :

    मालेगाव महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया संपताच महापालिका इमारतीत घडलेल्या गंभीर घटनेने एकच खळबळ उडाली. इमारतीतील प्रवासी लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक कोसळली. मात्र सुदैवाने लिफ्ट थेट तळमजल्यावर आदळण्याआधीच पहिल्या मजल्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी लिफ्टमध्ये एकूण १८ जण प्रवास करत होते. चौथ्या मजल्यावरून खाली येताना लिफ्ट वेगाने कोसळू लागली, मात्र पहिल्या मजल्यावर तिचा दरवाजा अडकल्याने ती तिथेच थांबली. काही क्षण सर्वांसाठी भीतीचे होते, मात्र याच घटनेमुळे सर्व प्रवासी बचावले.

    अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकेक करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे नेते असिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक तसेच पाच पत्रकार अडकले होते. बचावकार्यादरम्यान सर्वजण सुरक्षित बाहेर आल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

    या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या सुरक्षितता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिकेसारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीतील लिफ्टची नियमित देखभाल व तांत्रिक तपासणी वेळेवर होते की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. लिफ्टच्या देखभालीतील त्रुटी, देखरेख करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आणि यापूर्वी केलेल्या तपासण्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून तसेच लोकप्रतिनिधींमधून होत आहे.

    सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.