साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत ‘मेरी माती मेरा देश’ संपूर्ण देशात राबविले जात आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व लोकांमध्ये आपल्या देशाबद्दल देशप्रेमाची भावना जागृत व्हावी, यासाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे धुळे-चोपडा रस्त्यावरील दुभाजकावर असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर तिरंगा विद्युत रोषणाई केलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अमळनेर प्रकाशमय झाला आहे.
अमळनेरच्या सौंदर्यात वाढ करून व तिरंगा रंगाच्या रोषणाईने देशाप्रती एक देशप्रेमाची भावना दाखविण्याची संकल्पना दाखविण्याचे नाविन्यपूर्ण काम अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता प्रशांत ठाकूर यांनी उत्कृष्टपणे केले आहे. याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.