लोहाऱ्यातील तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

0
13

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील भाऊसाहेब तुकाराम आनंदा माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध जाहीर करण्यात आली. त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. सुभाष घोंगडे तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल बनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पतसंस्थेवर डॉ.सुभाष घोंगडे यांची सुमारे पंधरा वर्षापासून एक हाती सत्ता आहे. संस्थेची झपाट्याने होणारी भरभराट, सामाजिक कार्यात अग्रेसर, गरजेच्या वेळी सभासदांच्या दुःखात सहभागी होणारी संस्था यामुळे डॉ.सुभाष घोंगडे यांनी सभासदांचा विश्‍वास संपादन केल्याने यंदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यात बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये डॉ.सुभाष घोंगडे, विठ्ठल बनकर, ज्ञानेश्‍वर माळी, विजय पालीवाल, ज्ञानेश्‍वर चौधरी, सुभाष माळी, भास्कर जाधव, देवानंद भोई, सुनंदा गीते, वंदना बनकर यांचा समावेश आहे. तसेच कार्यपद्धतीवर विश्‍वास ठेवून चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात डॉ.सुभाष घोंगडे आणि विठ्ठल बनकर यांच्यावर विश्‍वास दाखविण्यात आला. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी विकासोचे चेअरमन सुनील क्षीरसागर, शरद सोनार, प्रभाकर चौधरी, शिवराम भडके, विकास देशमुख, नंदू सुर्वे, सचिव रमेश शेळके, बाजीराव माळी, विठ्ठल भडके, नाना चौधरी, आबा चौधरी, पाल पांढरे, उमेश देशमुख, संतोष पालीवाल उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाचोरा येथील सहकारी अधिकारी आर.डी.राऊत यांनी काम पाहिले. यासाठी पतसंस्थेचे कर्मचारी रमेश सरोदे, सोपान सरोदे, गजानन माळी यांनी परिश्रम घेतले. पतसंस्थेच्या बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here