नशिराबाद पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील भादली येथे वृध्द महिलेच्या सुनेला अश्लिल इशारा केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत वृध्द महिलेला चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी, १४ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील भादलीत लताबाई पुंडलिक कोळी (वय ६०) ही वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी सकाळी ९ वाजता वृद्ध महिलेची सुन घरी असतांना गल्लीत राहणारा सोनू कोळी याने अश्लिल इशारा केला. तेव्हा त्याचा जाब लताबाई कोळी यांनी विचारला. त्याचा राग आल्याने प्रकाश कोळी, मीराबाई कोळी, निखिल कोळी, सोनू कोळी अशा चौघांनी वृद्ध महिलेला शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर व दुखापत केली आहे.
याप्रकरणी लताबाई कोळी यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन मारहाण करणाऱ्या प्रकाश कोळी, मीराबाई कोळी, निखिल कोळी आणि सोनू कोळी अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. अनिल देशमुख करीत आहे.