गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचे ट्विट: ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, विझणार कधीच अंगार नाही’

0
41

मुबंई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी ट्विट करत आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली नाहीच, हिंदुत्वाशिवाय आपला विचार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदेंनी लगावला आहे.
शिंदेंनी वेळ साधली

ठाण्यात एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या सोबत रहात समाजकाऱ्यास सुरुवात केली होती. दिघेंनी एकनाथ शिंदेंना राजकारण शिकवले असे म्हटले तर गैर ठरणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आता ट्विट करत गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन केले आहे. सध्या खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू असताना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत वेळ साधली आहे्.

आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदेंसह जवळपास 40 शिवसेना आमदारांनी बंड केले होते. यानंतर राज्यात 13 दिवस राजकीय नाट्य सुरू होते. यामध्ये बंडखोर आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली होती, त्यांनतर मात्र अनअपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. भाजपने आम्ही एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे सांगतांना हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे ,असेही म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here