साईमत, जळगाव : प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा मूळजी जेठा महाविद्यालयातील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नुकताच समारोप झाला. शिबिरात १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून हास्य जत्रा फेम तथा मू.जे. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.हेमंत पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ.जगदीप बोरसे, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, आंतर राष्ट्रीय सायकलिंग खेळाडू आकांक्षा गोरख म्हेत्रे आणि शिबिर प्रमुख प्रा.रणजित पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रा.रणजित पाटील यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी प्रा. हेमंत पाटील व डॉ. जगदीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमीची भविष्यातील वाटचाल यासंबंधी माहिती दिली.
उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव
यावेळी सामान्य क्रीडा प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षक व उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरात खेळनिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. विविध क्रीडा प्रकारात लक्ष गुरखा, श्लोक चौधरी, अर्णव सपकाळे, अमय सोनवणे, पार्थ सोनवणे, समर्थ सोनवणे, ध्रुव गाडे, आयुष भोई, चेतन भोई व रुचिका सोनवणे यांनी यश प्राप्त केले. सामान्य शिबिरातील विवान तारे, सान्वी चौधरी, हर्षदा भोई व पियुष अहिरे हे उत्कृष्ट खेळाडू ठरले. यशस्वीतेसाठी राजेंद्र नारखेडे, वसंत सोनवणे, रिना पाटील, चंद्रलेखा जगताप, शंकर ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तुलसी कुलकर्णी यांनी केले.
