साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्यावतीने येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी आठव्या ‘ऋणानुबंध’ वधु-वर-पालक परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत मेळाव्याचे नियोजन सूत्रबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी मेळावा नियोजन समिती जाहीर करण्यात आली. बैठकीत उपस्थित समाज बांधवांनी अनेक सूचना मांडल्या. सर्व सूचनांवर विचार करून पुढील नियोजन करू, अशी ग्वाही महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी दिली. खेळीमेळीच्या वातावरणात बैठकीची सांगता झाली.
मेळाव्याची कार्यकारिणी अशी
‘ऋणानुबंध २०२४ ‘वधु-वर-पालक परिचय मेळाव्याच्या कार्यकारिणीत स्वागताध्यक्ष म्हणून विजय वसंत विसपुते, नियोजन समिती प्रमुखपदी शाम छगन भामरे, मेळावा प्रमुख दीपक बन्सी जगदाळे, उपप्रमुख भगवान मुरलीधर दुसाने, सचिवपदी प्रशांत त्र्यंबक विसपुते, सहसचिव शशिकांत भिका जाधव, प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुभाष अशोक सोनार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सर्वांच्या पाठबळावरच मेळावा यशस्वी करू
मेळावा नियोजनात्मक पद्धतीने यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांसह सर्वांचे मार्गदर्शन मिळाल्यावरच मेळावा यशस्वी करू शकू, असे मत जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी व्यक्त केले. बैठकीला समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, जळगावच्या सर्व महिला पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या.