कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
प्राईम पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित संरक्षणशास्त्र विषयावरील आठ क्रमिक व संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन कुलगुरू प्रा. एस. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते कुलगुरू यांच्या दालनात नुकतेच पार पडले. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक प्रा. ए. पी. चौधरी, डॉ. देवेंद्र विसपुते, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विजय पालवे, कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, सिनेट सदस्य डॉ. सुरेखा पालवे तसेच प्राईम पब्लिशिंग हाऊसचे संचालक प्रदीप पाटील यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथांचे शैक्षणिक व संशोधनपर महत्त्व कुलगुरू प्रा. एस. एल. माहेश्वरी यांनी अधोरेखित केले. संरक्षणशास्त्राच्या अभ्यासासाठी तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथ मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकाशनामुळे संरक्षणशास्त्र विषयातील अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
