साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर
येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी केली. मिरवणुकीला दुपारी बिजली शाह बाबा दर्गापासून सुरुवात झाली. मिरवणुकीत नाते शरीफचे पठण करत मिरवणूक हजरत सादिक शाह सरकार, बिर्ला चौक मार्गे निघून ईदगाह मैदानात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी तेथे नमाज अदा केली. विश्वशांती हिंदू-मुस्लिम एकता गरीब दुर्बल घटक व आरोग्यांसाठी प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीत पांढरे शुभ्र वस्त्र पठाणी ड्रेस व फेटा आकर्षित ठरले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ए.पी.आय. योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.