मलकापूर जवळ लक्झरी बसला आयशरची धडक

0
14
मलकापूर जवळ लक्झरी बसला आयशरची धडक-jalgaon-saimat

साईमत मलकापूर प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुक्ताईनगर मार्गावर जग्गुमामा धाब्यानजीक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या  लक्झरी बसला भरधाव आयशर ने जबर धडक दिल्याने झालेल्या  भीषण अपघातात एका  गर्भवती महिलेसह चार ठार झाल्याची घटना दि ३० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी ७ वाजेच्या  सुमारास नागपूरकडे जात असलेली लक्झरी बसचे टायर पंचर झाल्याने पंचर दुरुस्तीसाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या लक्झरी (क्रमांक एम पी १८ बीजी ८३५१) ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली या अपघातात लक्झरी समोर उभे असलेले राजू भाई उर्फ हरी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर भरधाव आयशर  रोडाच्या विरुद्ध दिशेला जाऊन धडकली. धडक लागल्याने त्या ठिकाणी उभ्या असलेल्या गर्भवती महिला अंजली आकाश जाधव ( वय २७ ) ही गंभीर जखमी झाल्या.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, तर आयशर चालक किरण खंडू भदाणे (वय ४२ )  त्याच्यासोबत असलेला सिताराम उर्फ आप्पा राम बारेला ( वय ५५ ) दोघे राहणार अमराळ तालुका सिंदखेडराजा यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर स्टेशनचे पीएसआय नरेंद्र ठाकूर, देवानंद कोळी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले.

याबाबत नदीम खान नईम खान पठाण ( वय ३४ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि अशोक रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्मिता म्हसाये करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here