भेदभाव न करता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न

0
12

साईमत, विदगाव/जळगाव : प्रतिनिधी

शेतकरी व जनतेच्या हिताचा विचार करून आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच त्यांच्यासाठी झटत आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न बाळगता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच कार्यकर्ते आणि जनता माझ्या सोबत आहे. मतदारसंघातील शेतीचे व वर्दळीच्या वाहतुकीचे रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाला आपण प्राधान्य दिले आहे. उर्वरित स्मशानभूमी बांधकाम व स्मशानभूमी पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. ते अवचित हनुमान मंदिर सभागृहात तालुक्यातील, नांद्रा, आवार, तुरखेडा, धामणगाव आणि विदगाव या गावांमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमांमध्ये रिधुर येथे कानळदा ते रिधूर रस्ता डांबरीकरण ४ कोटी ५८ लाख, अंगणवाडी व सभागृह, काँक्रीटीकरण २७ लाख व पाणीपुरवठा योजना ४५ लाख तर अवचित हनुमान मंदिर परिसरात भक्तनिवास काँक्रिटीकरण, संरक्षण भिंत व पेव्हिंग ब्लॉक बसविणे २ कोटी, नांद्रा येथे भूमिपूजन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत ममुराबाद ते नांद्रा रस्त्याचे डांबरीकरण ५ कोटी, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम २० लाख, गटार बांधकाम १३ लाख, काँक्रिटीकरण ५ लाख तर लोकार्पण- आमदार निधी व २५१५ मधून गाव अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण २०लक्ष, स्मशानभूमी बांधकाम १० लक्ष, पाणीपुरवठा योजना ३३ लाख, विदगाव येथे कानळदा ते जिनिंग रस्ता डांबरीकरण- ५० लाख, पाण्याची टाकी व पाइपलाइन ५१ लाख, व्यायामशाळा बांधकाम १६ लाख, स्मशानभूमीचा रस्ता व संरक्षक भिंत २५ लाख, रिधुर येथील अवचित हनुमान मंदिर परिसरात – धामणगाव येथे लोकार्पण – जलजीवन अंतर्गत पाण्याची टाकी ३६ लाख, कोळी समाज सभागृह २० लाख, पेव्हिंग ब्लॉक ३० लाख व काँक्रिटीकरण १० लाख, गाव अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक व काँक्रिटीकरण २८ लाख अशा कामांचे लोकार्पण करण्यात आले. खापरखेडा येथे व आवार येथे विविध विकास कामे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, पंचायत समितीच्या माजी सभापती ललीता पाटील-कोळी, जनाआप्पा कोळी, सर्व सरपंच, उपसरपंच, राजेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, चुडामण कोळी, भगवान कुंभार, नारायण पाटील, गोकुळ कोळी, सुनील कोळी, नितीन कोळी, भास्कर कोळी, पंकज पाटील, वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील, सुरेखा सोनवणे, निशिगंधा सपकाळे, गुड्डू सपकाळे, गलु सपकाळे, डॉ.अजय सपकाळे, रघुनाथ पाटील या सरपंच व उपसरपंचासह दूध संघाचे रमेश पाटील, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, शिवाजी कोळी, जितू पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक आणि युवा सैनिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन जनाआप्पा कोळी तर आभार शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राजेंद्र चुव्हाण यांनी मानले.

फटाक्यांच्या आतषबाजीसह जोरदार घोषणाबाजीत मिरवणूक

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती ललीता पाटील- कोळी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा गोषवारा सादर केला. त्यांनी शेरो- शायरीने केलेल्या भाषणाची उपस्थितांनी दाद दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील म्हणाले की, पालकमंत्री हे मतदारसंघरूपी कुटुंबाकडे प्राधान्याने लक्ष देत आहे. विकास कामांचा त्यांनी धडाका लावला असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी रोजी करण्यात आले.

यावेळी नांद्रा, आवार, तुरखेडा, धामणगाव, रिधुर आणि विदगाव येथे पालकमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सर्व ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांचा आजी-माजी सरपंच, चेअरमन व लोकप्रतिनिधींनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here