साईमत जळगाव प्रतिनिधी
केसीई एज्युकेशन सोसायटी संचालीत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाची शैक्षणिक सहल जगप्रसिदध अजिंठा लेणी येथे संपन्न झाली. सहलीमध्ये शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणी येथे विद्यार्थ्यांनी हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात उंच पर्वतात कोरलेल्या अजिंठा लेण्यातील भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिल्प स्वरूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार विद्यार्थ्यानी यावेळी बघितला.बुद्धांच्या जातक कथांचा अभ्यास चित्र रूपाने केला.आधुनिक काळात वापरल्या वस्तू प्राचीन काळातसुद्धा अस्तित्वात होत्या हे चित्र शिल्प पाहून जाणून घेतले.लेण्यातील बारीक नक्षीकामाचे निरीक्षण करून त्यात असलेली नाविन्यता अनुभवली.
अजिंठा लेणी बघायला आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत विद्यार्थ्यानी मुक्तपणे गप्पा गोष्टी केल्या.निसर्गाच्या कुशीत झाडांच्या गार सावलीत विद्यार्थ्यानी जेवणाचा आस्वाद घेतला.परतीच्या प्रवासात पारले बिस्कीट फॅक्टरी ला भेट देत बिस्कीट निर्मिती कशा प्रकारे केली जते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहीले.सहलीचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव गायत्री पवार तसेच कल्पना पाटील यांनी केले. सहलीला शाळेच्या मुख्या.धनश्री फालक उपस्थित होत्या तर शिपाई सुधीर वाणी यांचे विशेष सहकार्य लाभले.