वडिलांच्या सेवानिवृत्तीबद्दल मुलाने वाटले शैक्षणिक साहित्य

0
38

टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शांतीसुत पी.टी.पाटील सेवानिवृत्त

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शांतीसुत म्हणून परिचित असलेले प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) ३३ वर्ष १ महिना २८ दिवसांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयाच्या ५८ व्यावर्षी नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा मुलगा स्वप्नील पाटील (आयटी इंजिनिअर, पुणे) यांनी स्वखर्चाने वडिलांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या १७० विद्यार्थ्यांसाठी उजळणीचे पुस्तके तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची डिक्शनरी असे १९८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून राजगिऱ्याचे लाडूचे वाटप केले. तसेच शाळेतील स्वयंपाकी आशा कोळी व मदतनीस श्रीमती लताबाई तायडे यांना भेटवस्तू म्हणून साडी वाटप केले. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपाली उघडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून स्वप्नील पाटील, सायली पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी गितेश आगळे व समर्थ भोई यांनी तसेच पदवीधर शिक्षक नाना धनगर, उपशिक्षक कैलास महाजन यांनी मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते भावनिक झाले होते.

वाचन लेखन करण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता असते.तसेच गणिती प्रक्रिया करण्यासाठी पाढे पांठातर असणे गरजेचे आहे. त्यासाठी उजळणी पुस्तकांचा वापर करा. नियमितपणे अभ्यास करावा. आई – वडिलांची, शिक्षकांची आज्ञा पाळा. तुम्हाला मिळालेले शैक्षणिक साहित्य हे किती किमतीचे आहे याचा विचार न करता ते साहित्य आपल्यासाठी किती उपयुक्त आहे याचा विचार करावा, असे स्वप्नील पाटील म्हणाले.

पी.टी.पाटील यांचा भेटवस्तू देऊन सत्कार

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपाली उघडे, सदस्य निवृत्ती आगळे, सुधाकर गोसावी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यातर्फे तसेच शाळेतील स्वयंपाकी व मदतनीस यांच्यातर्फे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षक मिलिंद तायडे, प्रशिक्षणार्थी शिक्षिका श्रीमती माधुरी तायडे यांनी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नाना धनगर तर आभार कैलास महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here