डॉ.हेडगेवार प्राथमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

0
94

सप्ताहात विविध उपक्रम राबविले

साईमत/न्यूज नेटवर्क/पहुर, ता. जामनेर :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै दरम्यान सर्वच शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. अशातच पहूर कसबे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार विद्यालयात शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.

शैक्षणिक सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित केला होता. ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश होता. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा असल्यामुळे, शिक्षणाविषयी जनजागृती, पर्यावरण रक्षण (वृक्ष लागवड) विषयी संदेश देण्यात आला.

विविध उपक्रमांचा समावेश

शिक्षण सप्ताह दरम्यान दररोज विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये निपुण प्रतिज्ञा, तरंग चित्रे, खेळ व खेळाचे महत्व, पारंपारिक वेशभूषा, पथनाट्य, नृत्य,गीत गायन, मातीकाम, वृक्षारोपण आदींचा समावेश होता. शिक्षण सप्ताहाची सांगता बाल -गोपालांचे स्नेहभोजन, प्रभात फेरीने करण्यात आली. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख, अमोल क्षीरसागर, मनोज खोडपे, संदीप पाटील, सोनाली सोनाली शेकोकारे, यूनूस तडवी, विद्या पवार, किरण पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here