Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»ईडीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील छाप्यात १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोने लागले हाती
    मुंबई

    ईडीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील छाप्यात १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोने लागले हाती

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 20, 2023Updated:August 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून नुकतीच छापेमारी करण्यात आली होती.या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते.या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे मात्र या छाप्यात ईडीच्या हाती १३०० किलोपैकी केवळ ४० किलो सोने हाती लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
    राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चाही रंगली आहे. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी जोडला जात असला तरी स्वत: ईश्वरलाल जैन यांनी त्याचा पत्रकार परिषदेत साफ इन्कार केला आहे.
    परंतु या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांनी जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा त्याठिकाणी खूप मोठ्याप्रमाणात सोन्याचा साठा असेल असा अंदाज होता मात्र ईडीच्या या कारवाईत १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोने हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे.ईडीने ईश्वरलाल जैन यांच्या संपत्तीचा तपशील तपासला होता. यावेळी त्यांच्या तीन ज्वेलरी कंपन्यांकडून बोगस व्यवहारांच्या नावाखाली पैशांची अफरातफर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
    गेल्या डिसेंबर महिन्यात सीबीआयकडून राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या कंपन्या आणि त्यांचे प्रवर्तक असलेले ईश्वरलाल जैन, मनिष जैन आणि त्यांच्या अन्य कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपींनी स्टेट बँकेकडून ३५३ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन हप्ते थकवल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदविलेल्या या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ईश्वरलाल जैन यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला.
    बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नेमका कुठे?
    शईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा सोन्याचा बरासचा साठा त्याठिकाणी आढळला नाही.लखीचंद ज्वेलर्सने त्यांच्याकडे बँकेकडून कर्ज घेताना १२८४ किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी केवळ ४० किलो सोन्याचेच दागिने सापडले. त्यामुळे बँकेकडून कर्जापोटी घेतलेल्या ३५३ कोटी खोटे खरेदी व्यवहार दाखवून इतरत्र वळवण्यात आले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या तिन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नेमका कुठे करण्यात आला,याबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नसल्याचेही वृत्त आहे.त्यामुळे माजी खासदार व उद्योजक ईश्वरलाल जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.