विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केले इको फ्रेंडली आकाश कंदील

0
14

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी:-

नळदुर्ग येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केले इको फ्रेंडली आकाश कंदील. जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर घेतले जातात.

नळदुर्ग येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा शहरांतील सर्वात जुनी शाळा आहे. या शाळेची गुणवत्ता दर्जेदार व चांगली आहे. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

दिवाळीच्या सुट्टीपुर्वी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांला आकाश कंदील घरातुन तयार करून आणण्यास सांगितले होते. हे आकाश कंदील इको फ्रेंडली असावेत असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतीशय सुंदर व विविध प्रकारचे इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून आणले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अशा वस्तु तयार

करण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शाळांमधुन असे उपक्रम राबविले जाण्याची गरज आहे.
शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. मस्के, एम. जे. सय्यद, बी. एस. सौदागर, शिक्षिका व्ही. आर. चौधरी, मोरे मॅडम व भालकाटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनापासुन हे इको फ्रेंडली आकाश कंदील तयार केले असल्याने ते अतीशय सुंदर व चांगल्या दर्जाचे तयार झाले आहेत. दि.२० ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थ्यांनी आकाश कंदील तयार करून शाळेत आणले होते. विविध रंगाच्या आकाश कंदीलाने शाळेचे वातावरण रंगबिरंगी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here