साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
राज्यस्तरीय राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद जळगाव येथे सुरु असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनस्थळी खा.क्षा खडसे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच शासनकडे आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले.
राज्यस्तरीय राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीने १० ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत शासनास कळविले होते. मात्र, शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी (समुदाय आरोग्य अधिकारी, शालेय आरोग्य तपासणी पथक, आरोग्य सेविका/सहाय्यिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निमार्ण अधिकारी, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, प्रा.आ.केंद्रस्तरीय व उपकेंद्रस्तरीय तसेच नागरी प्रा.आ.केंद्रस्तरीय सर्व संवर्गातील) कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन कृती समितीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे आंदोलनाला खा. रक्षा खडसे यांनी भेट दिली.