साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्यांबाबत आज दि.१ ऑक्टोबर २०२४ दुपारी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना पदाधिकारी शिष्टमंडळाने मा.वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
त्यात प्रामुख्याने थकीत वैद्यकीय देयके, १०० टक्के अनुदानितच्या सप्टेंबरचे नियमित वेतन, न.पा. संचालित व अंशतः अनुदानित उ.मा.वि.चे ऑगस्ट २०२४ चे थकीत वेतन तसेच ई-कुबेर प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी अंशतः अनुदानितसाठी अत्यावश्यक निधी उपलब्ध नसल्याने ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन रखडले असल्याचे तसेच थकीत वैद्यकीय देयके आणि न.पा.संचलित उ.मा.विं.च्या ऑगस्टच्या वेतनाची बी.डी.एस.मंजूर झालेली असून ई-कुबेर प्रणालीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतरच सदर रक्कम संबंधितांच्या खात्यात तात्काळ जमा होईल असे श्री.शर्मा यांनी सांगितले. जिल्ह्यातील उ.मा.वि./ क.म.वि.शिक्षक ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतनापासून वंचित राहणार आहेत.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
उर्वरित सर्व समस्या लवकरच सुटतील, असा आशावाद श्री.शर्मा यांनी व्यक्त केला. शिष्टमंडळात प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा. गजानन वंजारी, डॉ.अतुल इंगळे (उपाध्यक्ष),प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष), प्रा.सुधाकर ठाकूर (अध्यक्ष जळगाव ग्रामीण), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक) यांचा समावेश होता.