सणांमध्ये सर्वांनी मिळून सामाजिक बांधिलकी कायम स्वरुपी टिकून ठेवावी

0
34

डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनी दोन्ही समाजाचे केले कौतुक

साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :

ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामाजिक ऐक्य जपून स्वत: सावदा येथील हिंदू-मुस्लिम बांधवांनी ज्या पद्धतीने ऐक्य दाखवले हे बघून चिंतामुक्त झालो. यापुढेही अशीच सर्वांनी मिळून सामाजिक बांधिलकी जोपासून कायम स्वरुपी टिकून ठेवावी, अशी अपेक्षा मनोगतात व्यक्त करुन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दोन्ही समाज बांधवांचे कौतुक केले.

यंदा योगायोगाने सप्टेंबर महिन्यात ईद-ए-मिलाद आणि गणेश उत्सव आल्याने छत्रपती संभाजी मित्र मंडळ, राणा गणेश मंडळ, प्रभात गणेश मंडळ यांनी नियोजित ठिकाणऐवजी दोघा समाजात जातीय सलोखा कायम रहावा, याकरिता मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बैठकीत असे ठरवले की, १६ तारखेला ईद-ए-मिलादची मिरवणूक मुस्लिम बांधवांनी निसंकोचपणे मार्गस्थ केली पाहिजे. यासाठी सर्व मंडळांनी पथ मार्ग सोडून एक अनोखा उपक्रम राबविला होता. त्यात संभाजी मित्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन मोलाची भूमिका बजावली. त्यामध्ये इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही सहकार्य केले आहे.

ईद-ए-मिलादची मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर जातीय सलोखा नावाखाली मुस्लिम बांधवांनी शहरातील मुख्य चांदणी चौक परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, पत्रकार शाम पाटील, समाजसेवक कुशल जावळे यांच्यासह छत्रपती संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश अकोले, राणा गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विक्की भिडे, अमर गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहन कासार, प्रभात गणेश मंडळाचे अध्यक्ष भूषण परदेशी अशा सर्व मान्यवरांचा चांदणी चौक मुस्लिम कमेटीचे निसार अहमद, माजी नगरसेवक फिरोज खान(लेफ्टी), समद गुलाब, गुड्डू मेंबर, पत्रकार युसूफ शाह, पत्रकार फरीद शेख, मोईन लाला, कलिम जनाब, बाबू मुस्लिम, मोहसीन शेख यांनी फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी दोघा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार फरीद शेख तर आभार कलिम जनाब यांनी मानले.

जातीय सलोखा आमच्या रक्तात : माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे

कार्यक्रमात आमंत्रित करून माझ्यासह मान्यवरांचा आणि गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा अशा पध्दतीने मनपूर्वक सत्कार केल्याबद्दल चांदणी चौक मुस्लिम कमिटीचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सर्वप्रथम आभार मानले. त्यानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वधर्मसमभावाची कार्यात्मक व्याख्या अतिशय मार्मिक शब्दात मांडताना जातीय सलोखा आमच्या रक्तात असल्याचे प्रतिपादन केले. दोघा समाजाच्या लोकांना ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here