साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करावा, यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी उपोषणाच्या सातव्या दिवशी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘डफ बजाओ’ आंदोलन करण्यात आले. उपोषणस्थळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक धर्मभूषण नानासाहेब बागुल यांनी नुकतीच भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी बुधवारी, २७ सप्टेंबरपर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाल्याने तत्कालीन राज्य सरकार विरोधात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मराठा समाजातून आरक्षणाची जोरदार मागणी होत असताना राज्य सरकार फक्त आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, अशी मागणी केली आहे.
उपोषणस्थळी गणेश पवार, दिलीप पाटील, खुशाल पाटील, सतीश पवार, मनोज भोसले, सुदर्शन देशमुख, प्रदीप देशमुख, राजेंद्र पाटील, सुधीर पाटील, कुणाल पाटील, विनायक मांडोळे, संजय देशमुख, नंदकुमार पाटील, विजय देशमुख, नाना शिंदे, बापू पाटील, प्रदीप मराठे, पी.एन. पाटील, विकास पवार, अरविंद पाटील, चेतन देशमुख, विनोद जाधव, राहुल मस्के, निवृत्ती कवडे, दिनकर कडलग, तुषार म्हस्के, सुमित कापसे, सुनील पाटील, रावसाहेब भोसले, सोनाली बोराडे, प्रतिभा पवार, सहभागी झाले होते. उपोषणाला आ. मंगेश चव्हाण, प्रा.सुनील निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, कैलास सूर्यवंशी, पं.स. सदस्य संभाजीराजे पाटील, सायगावचे सुरेश सोनवणे, राज पुंशी, संभाजी ब्रिगेडचे गोरख साळुंखे, शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने पत्र देवून पाठिंबा दिला. याप्रसंगी मोहिनी मगर, कविता साळवे, मगण बैरागी, देवचंद साबळे, हिम्मत निकम, अशिष सानप, महेंद्र जैस्वाल आदींनी साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.
