बेरोजगारी, महागाईमुळे ‘त्या’ तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदली : राहुल गांधी

0
19

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला केंद्रातील मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली. या घटने मागे बेरोजगारी आणि महागाई हे प्रमुख कारण आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना सभागृहात वक्तव्य करायचे नाही. या विषयावर ते प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये करत आहेत, मात्र सभागृह सुरळीत चालावे यासाठी ते सभागृहात बोलत नाहीत, असा निशाणा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर साधला.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सांगितले की, मीडियाने तरुणांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, हे सर्व तरुण बेरोजगारीमुळे नाराज आहेत. त्यामुळे नोकऱ्या मिळत नसताना त्यांनी मूकबधिर सरकारला जागे करण्यासाठी सभागृहात
उडी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here