Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Yuvarang Festival : युवारंग महाेत्सवामुळे जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा परिसर संगीतमय वातावरणाने गजबजला
    जळगाव

    Yuvarang Festival : युवारंग महाेत्सवामुळे जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा परिसर संगीतमय वातावरणाने गजबजला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 9, 2025Updated:October 9, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विविध कार्यक्रमात महाविद्यालयांच्या संघांनी नोंदविला सहभाग

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जल्लोषात उद्घाटन झाल्यानंतर दुपारच्या सत्रात जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा परिसर संगीतमय वातावरणाने गजबजला होता.

    रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात नकलाकार सादर करीत असताना प्रत्येक स्पर्धक आपल्या बाजूने कला सादर करताना दिसत होता. राजकीय नेते, चित्रपट अभिनेता, पक्षी, विविध कार्टून, पुष्पा चित्रपटातील नायक, संगीत वाद्य, नामवंत गायकांचे आवाज, विमान उड्डाण तसेच अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, निळू फुले, इंदोरीकर महाराज आदींची नक्कल हुबेहुब सादर करीत असताना प्रेक्षक विद्यार्थ्यांमधून दाद मिळवत होते. त्यात २३ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. त्याच रंगमंचावर दुपारच्या सत्रात मूक अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. त्यात भ्रमणध्वनीचा अतिरेकविषयी जनजागृती, ॲसिड अटॅक, कृत्रिम बुध्दीमत्तेचा मानवतेवर होणारा परिणाम तसेच पालकांना मुलांकडून काय हवयं आदी विषयावर २९ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला.

    रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे भारतीय समुहगान स्पर्धेचे आयोजन केले होते. या कलाप्रकारात २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘हे माय भू तुझे मी’, ‘गार डोंगराची हवा’, ‘रडू नको बाळा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’, ‘हा देश माझा याचे भान’, ‘इतनी शक्ती हमें देना दाता’, ‘खंडोबाची कारभारीन’, ‘तेरी लाल पिली अखिया’, ‘जय भारता जय भारता’, ‘छन छन बाजे पायलिया’ यासह अनेक समुहगान सादर करीत विद्यार्थ्यांनी दाद मिळवली. आपल्या गाण्याच्या बोलीनुसार विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा लक्ष्य वेधून घेत होते.

    रंगमंच क्रमांक ३ कवी प्रदीप सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. देशभक्तीचे व्यापक संदर्भ हा विषय स्पर्धकांना देण्यात आला. प्रत्येक सहभागी आपल्या बोलण्यातून देशभक्ती अंगात संचारत असताना दिसून आला. त्यात ८१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ४ दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

    रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन सभागृहात स्थळचित्र ही स्पर्धा आयोजित केली होती. रायसोनी महाविद्यालय हा विषय स्थळचित्रासाठी देण्यात आला होता. स्पर्धेत ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी विद्यार्थी आपले स्थळचित्र रेखाटतांना दिसून येत होते. याच रंगमंचावर दुपारी ४ वाजता व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली होती. रस्त्यावरील विक्रेता, राजकीय पात्र व पौराणिक पात्र असे तीन विषय देण्यात आला होता. अतिशय सुरेख पध्दतीने प्रत्येक स्पर्धक आपल्या कुंचल्यांनी दिलेल्या विषयावर चित्र काढताना दिसून येत होते. ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ४ विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी सहभागी होते.

    रंगमंच क्रमांक ५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृहात भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य) ही स्पर्धा होती. त्यात १२ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी होता. बासरी, हार्मोनियम, विणा आदी वाद्यांची साथ-संगत घेत अतिशय उत्साहाने आपले सादरीकरण विद्यार्थी करताना दिसून येत होते. त्याच रंगमंचावर दुपारच्या सत्रात भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य) ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात १५ विद्यार्थ्यांचा संघ आपली कला सादर करताना दिसून आले. तबला, पखवाज, ढोलकी, मृदुंग तसेच अत्याधुनिक वाद्य या प्रकारात वाजताना दिसून आले.

    महोत्सवातील शुक्रवारी सादर होणारे कार्यक्रम

    युवारंग महोत्सवात शुक्रवारी, १० ऑक्टोबर रोजी सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात प्रहसन सकाळी ८.३० ते ११.३०, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद दु. १ ते ४, एकांकिका सायंकाळी ४ ते ६.३०, रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पाश्चिमात्य समुहगान सकाळी ८.३० ते ११.३०, रंगमंच क्रमांक ३ कवी प्रदीप सभागृहात वादविवाद सकाळी ८.३० ते ११.३०, रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन सभागृहात चिकट कला सकाळी ८.३० ते ११.३०, माती कला दु. १ ते ४, स्थळ छायाचित्रण (प्राथमिक फेरी) सायंकाळी ४ ते ६.३०, रंगमंच क्रमांक ५ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात भारतीय शास्त्रीय गायन एकल सकाळी ८.३० ते ११.३०, पाश्चिमात्य गायन एकल दु. १ ते ४, पाश्चिमात्य वाद्यसंगीत एकल सायंकाळी ४ ते ६.३० आदीं कार्यक्रमांचा समावेश आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026

    Jalgaon : जिल्हा नियोजन समितीत पुढील आर्थिक वर्षासाठी मोठा निधी मंजूर

    February 2, 2026

    Jalgaon : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या बकरीला नवजीवन

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.