साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर :
विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. मलकापूर येथील नळगंगा नदीला पाणी आले आहे. त्यातच तालुक्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
पावसामुळे त्यातच तालुक्यातील वळजी येथील अपंग असलेले संदीप इंगळे यांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांनी ग्रामपंचायतीला वारंवार सांगून रस्त्यावर कोणतेही काम न केल्याने तसेच मुरूमही न टाकल्याने इंगळे यांच्या घरात पाणी शिरल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
जून महिन्यात जेमतेम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीची काम अाटोपले तर पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने आता शेतकरी सुखावला आहे. कोकणात पावसाने हाहाकार माजविला आहे. पावसाने आता विदर्भातील अनेक भागांमध्ये हजेरी लावली आहे. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर येथे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.