साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगांव येथे काही दिवसापासून वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे.काही वेळा तर रात्र भर विजे अभावी रात्र अंधारात काढावी लागते. दिवसा देखील अनेकवेळा वीज गायब होत असल्यामुळे विजेवर अवलंबून असलेल्या छोटया मोठया व्यवसायावर याचा परिणाम होतो.पाऊसामुळे डास, मच्छर वाढले आहे त्यात लाईट नसल्याने त्याचा त्रास होतो. याविषयी आज नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊ शाखा अभियंता श्री गौर यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. लोकप्रतिनिधी व महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक बंटी काळे, अजित काळे, राजू दुतोंडे, पप्पू पठाडे, पूनम परदेशीं, सुधीर पठाडे,धीरज काळे,अतुल सोनवणे,चेतन काळे, अनिल चौधरी,मुक्तार शाह, सुनील काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी शाखा अभियंता श्री गौर यांनी सांगितले की सोयगांव चे ३३ केव्ही उपकेंद्र नादुरुस्त आहे त्यामुळे तेथे बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होतो तसेच सोयगांव ला स्वतंत्र गावठाण फिडरची आवश्यकता आहे ते झाल्यास विजेच्या सर्व समस्या सुटतील असे गौर म्हणाले.