खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा

0
12

साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी
खानदेशात सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले आहे. पावसाने दीड महिन्यापासून ओढ घेतली आहे. त्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस झाला तरी पिकांना जीवनदान मिळेल, अशी शक्यता नाही.त्यामुळे खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईत चर्चेव्ोळी केली.
आ. रावल म्हणाले, की पावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी जलस्रोतांची पातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर लागवडीवर परिणाम झाला आहे. कापसाची वाढ खुंटली आहे. या सर्व स्थितीचा शेतीप्रधान खानदेशातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे. शिंदखेडा मतदारसंघात बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्‍न आहे. ही स्थिती लक्षात घेता खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, रोहयोची कामे सुरू करावी, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ कराव्ो, पीक विमा मंजूर करून काही रक्कम अग्रीम द्यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here