नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 10.15 वाजता घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.
हे माझे सौभाग्य
राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतिपदी झाली.
प्राथमिक शिक्षणही स्वप्नवत
राष्ट्रपती म्हणाल्या, “मी जिथून आले त्या समुदायात, भागात अगदी प्राथमिक शिक्षण हेही स्वप्नवत आहे. गरीब, मागासलेल्याचे प्रतिबिंब माझ्यात दिसते. मी भारतातील तरुण आणि महिलांना खात्री देतो की या पदावर काम करताना त्यांच्या हितासाठी तत्पर असेल.
संसदेत माझी उपस्थिती भारतीयांच्या आशा आणि हक्कांचे प्रतीक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मला नवीन जबाबदारी घेण्याचे बळ देत आहे. मुर्मू म्हणाल्या, स्वतंत्र भारतात जन्मलेला मी पहिला राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीयांवर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक कर्तृत्व नसून देशातील सर्व गरिबांचे ते यश आहे. माझे नामांकन हा पुरावा आहे की भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहू शकत नाहीत, तर ती स्वप्ने पूर्णही करू शकतात.
देशहितासाठी कार्य करु
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, नव्या रस्त्यावर चालणाऱ्या भारतासाठी प्रगतीचा संकल्प करीत आहे. मी समस्त देशवासीयांना विश्वास देते की, या पदावर काम करताना मला देशहित महत्वाचे असेल. भारताच्या आजवरच्या सर्व राष्ट्रपतींनी हे पद भुषवले आहे.
स्वातंत्र्यसेनानींनी स्वाभिमान शिकवला
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानींनी राष्ट्रीय स्वाभिमान शिकवला. राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मासारख्या महिलांनी नारीशक्तीची भुमिका दाखवून दिली. संथाल क्रांतिने आदिवासींच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
भारताने नवे मापदंड प्रस्थापित केले
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आम्ही भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी जगासमोर नवे मापदंड प्रस्थापित केली. कोरोना व्हॅक्सिनचा जागतिक विक्रम आपण केला. कोरोना महामारीत जग झुंजतेय पण भारताकडे एका विश्वासने जग पाहत आहे. आगामी महिण्यात देश आपली जी-२० ग्रुपचे यजमानपदी असेल. भारतात होणाऱ्या या परिषदेचा येत्या काळात देशाला फायदा होईल.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी देशाच्या युवकांचा उत्साह आणि आत्मविश्वास जवळून पाहिला आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहोत. डिजीटल तंत्रज्ञानात देशाची महत्वाची भुमिका आहे. देशात नारीशक्तीलाही महत्व आहे. देशातील महिला आणि मुली सशक्त व्हाव्यात आणि त्यांनी देशाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान द्यावे.
भारताला आत्मनिर्भर बनवू
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आदिवासी समाजात माझा जन्म झाला. या समाजाने निसर्गासोबत आपला अधिवास ठेवला. मी जंगल आणि नद्यांच्या सानिध्यात होते. पूर्ण निष्ठेने काम करण्यासाठी मी तत्पर असून आपण सर्वांनी समर्पित होऊन भारताला आत्मनिर्भर बनवू वैभवशाली करु. तत्पूर्वी त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. तिथे त्यांनी रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. यानंतर मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील.
आदिवासी समाजात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10.15 वाजता देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी राजघाटावर पोहोचून त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची शपथ देतील. यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन राष्ट्रपतींचे अभिभाषण झाल्यानंतर मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील.
शपथविधीला ओडिशातील 64 विशेष पाहुणे
मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमाला ओडिशातील 64 विशेष पाहुणे उपस्थित आहेत. शपथविधीनंतर राष्ट्रपती भवनात विशेष पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वांना संपूर्ण इमारत फिरवली जाईल. मुर्मू हे 25 जुलै रोजी शपथ घेणारे देशाचे 10 वे राष्ट्रपती असतील.