केसीई च्या वर्धापन दिनानिमित्त रंगल्या नाट्यछटा स्पर्धा

0
26

साईमत जळगाव प्रतिनिधी

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव च्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवर्य प. वि.पाटील प्राथ.विद्यामंदिर तसेच ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरीय नाट्यछ्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन ओरिअन स्टेट बोर्ड शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर सूनकरी , डॉ.शमा सराफ, प्रसाद देसाई , मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे , मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते गणरायाच्या मुर्तीचे पुजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

स्पर्धा इयत्ता १ली ते थी पहिला गट , ५ वी ते ७ वी दुसरा गट , ८वी ते १० वी तिसरा गट अशा एकूण तीन गटामध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली.त्यात सावित्रीबाई फुले , श्यामची आई ,हिरकणी , शेतकरी , स्त्री भ्रूणहत्या ,इको फ्रेंडली गणपती ,वृद्धाश्रम,फुलराणी , नटसम्राट अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित भावनिक करणाऱ्या नाट्यछटा यावेळी सादर करण्यात आल्या.
स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम हेमांगी ठाकूर (सिंधुताई) अविनाश आचार्य विद्यालय, द्वितीय वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील (शेतकरी) गुरुवर्य प . वि.पाटील विद्यालय, तृतीय पायल राहुल निंबाळकर (सावित्रीबाई फुले ) शा.ल.खडके विद्यालय, उत्तेजनार्थ १ काव्या आनंदा फेगडे (इको गणपती) गुरुवर्य प . वि.पाटील विद्यालय, उत्तेजनार्थ २ कार्तिक तोतला ( वृद्धाश्रम) उज्वल स्प्राऊटर इंग्लिश मीडियम स्कूल.
दुसऱ्या गटात प्रथम अवनी सोनवणे (आकाशातील तारे ) प. न. लुंकड कन्या शाळा, द्वितीय केतकी कोरे (शेतकरी बाई ) प. न. लुंकड कन्या शाळा, तृतीय खुशी चौधरी (स्त्रीभ्रूणहत्या) विद्या विकास प्राथमिक विद्यामंदिर , उत्तेजनार्थ १ जतिन वाशीमकर ( आईच्या सूचना) वर्धमान युनिवर्स अकॅडमी , उत्तेजनार्थ -२ समृद्धी भास्कर ( टेक्नो सावित्री ) बालनिकेतन विद्यामंदिर.
गट ३ रा प्रथम संस्कृती पवनिकर ( आंदोलन ) प .न. लुंकड कन्या शाळा, द्वितीय रमा पुंडे ( स्त्री भ्रूण हत्या) विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय स्वराली जोशी ( फुलराणी) ओरियन स्टेट बोर्ड स्कूल, उत्तेजनार्थ -१ कुंजन दलाल (स्त्रीभ्रूणहत्या) प.न. लूंकड कन्या शाळा, उत्तेजनार्थ-२ देवश्री परदेशी ( संस्कार )उज्वल स्प्राऊटर इंग्लिश मीडियम स्कूल.
सर्व विजयी स्पर्धकांना के सी ई सोसायटीचे एच आर मॅनेजर प्रा.गोकुळ पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र तसेच रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांना नाटकाचा विषय कसा निवडावा? , त्यासाठी कशा प्रकारची वेशभूषा असावी? सादरीकरण कसे केले जावे ? तसेच कोणते पात्र कोणत्या स्वरूपात सादर करावे ? याविषयी स्पर्धेचे परीक्षक डॉ.शमा सराफ तसेच प्रा. प्रसाद देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यानी इतर बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे सुद्धा या वेळी दिली.
स्पर्धेचे सूत्रसंचालन उपशिक्षक पराग राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी एकनाथ पाचपांडे , विवेक मोरे ,रफिक तडवी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here