साईमत जामनेर प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळी व पळासखेडा बू. येथे डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा द्वारे तालुक्यातील श्री सदस्यांनी वृक्षारोपण करण्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी आमदार तथा मंत्री मा.ना.गिरीष महाजन (Girish Mahajan) सोबत जे के चव्हाण,चंद्रकांत बाविस्कर,जितेंद्र प्रल्हाद माळी सरपंच टाकळी,विजय रतिलाल चौधरी उपसरपंच व सर्व ग्रा.सदस्य टाकळी हजर राहून प्रतिष्ठान चे श्री बैठक टाकळी येथील श्रीसदस्य 245 यांनी निंबाची रोप 100, करंज रोप 25 व शिसम रोप 25, पिंपळ 25 तसेच प्रकाशचंद जैन मेडीकल काॅलेज येथे श्री बैठक मधुबन कॉलनी जामनेर येथील 30 श्रीसदस्यानी कडुनिंब रोप 70, करंज रोप 15, सिसम रोप 15 वृक्षारोपण प्रसंगी भिका राजाराम तायडे (सरपंच) ग्रा. पं. पळासखेडा बु. प्रफुल्ल पाटील उपप्राचार्य प्रकशचंद जैन मेडिकल कॉलेज पळासखेडे बू ता.जामनेर हे हजर होते.
यावेळी ऐकुण 275 रोप लावून वृक्षसंवर्धन चा सर्वानी संकल्प केला. प्रसंगी मा.ना.गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी डाॅ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे श्री सदस्यांनी प्रत्येक वर्षी वृक्षारोपण केले असून वृक्ष संगोपन केल्याने संपुर्ण तालुक्यात हजारो वटवृक्ष तयार झाली आहेत. हे विशेष कौतुकास्पद बाब असल्याचे मनोगत व्यक्त केलेआहे यामुळेच निसर्ग समतोल राखण्यास मदत होणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले.
