G.D. Bendale College : जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी डॉ. सत्यजित साळवे

0
8

विद्यार्थीभिमुख विविध उपक्रम राबवत करताहेत अध्यापन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्यपदी मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे.

जळगाव शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयाला नॅकने ‘अ’ श्रेणी देऊन सन्मानित केले आहे. अशा महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सत्यजित साळवे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते गेल्या १५ वर्षापासून सेवेत आहेत. त्यांनी विद्यार्थीभिमुख विविध उपक्रम राबवित अध्यापन आणि अभ्यासेतर पुरक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करतात. महाराष्ट्र शासनाने लोककलेच्या सर्वेक्षण व अभ्यासाचा १० लाखांचा दीर्घ संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. तसेच ते विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक आहेत.

यांनी केला कौतुकाचा वर्षाव

प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव प्रा.व.पु.होले यांच्यासह संचालक मंडळाने तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.व्ही.जे.पाटील, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.पी.एन.तायडे, उपप्राचार्य सुनिता पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here