Dr. Ravindra Thakur : जळगाव जिल्हा माहिती अधिकारीपदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू

0
30

जनहिताच्या शासकीय योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ.रवींद्र ठाकूर त्यांनी सोमवारी, १ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी डॉ.ठाकूर यांनी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजी नगर तर अहिल्यानगर, पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर काम केले आहे.

डॉ.ठाकूर हे मूळचे जळगाव येथील आहेत. त्यांनी शासकीय सेवेत येण्यापूर्वी दैनिक जनशक्ती, देशदूत अशा वृत्तपत्रांमध्ये तसेच मु. जे. महाविद्यालयात संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग प्राध्यापक म्हणून काम केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय हे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा दुवा मानले जाते. शासनाची ध्येय धोरणे आणि जनहिताच्या शासकीय योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे डॉ.ठाकूर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here