डॉ. होमी भाभा स्पर्धा परीक्षेत
प्रसाद कुलकर्णीचे यश
जळगाव ( प्रतिनिधी) –
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयातील इ 6 वीतील विद्यार्थी प्रसाद संदीप कुलकर्णी याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट या फेरीसाठी नामांकन प्राप्त केले आहे.
होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा भारत सरकारच्या शास्त्र आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चद्वारे आयोजित केली जाते.
ही परीक्षा विज्ञान आणि गणितामध्ये प्रगती करणाऱ्या बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना शोध, संशोधन आणि नवीन विचारांचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करते. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर संशोधन व आवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
त्यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाच्या विकासासाठी मार्गदर्शन करणे हा परिक्षेचा उद्देश आहे. परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते .डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या पहिल्या फेरीत कै.श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयातील 24 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यातील 15 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले सहावी वर्गातील तीन विद्यार्थी प्रसाद कुलकर्णी, योजित ठाकूर, कु. अन्वी नेरकर यांची निवड पुढील फेरीसाठी करण्यात आली होती.
या विद्यार्थ्याच्या निवडीबद्द्ल शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , विभाग प्रमुख स्वप्निल पाटील , सौ. रुपाली पाटील , विद्यासमिती प्रमुख जगदीश चौधरी व क्रीड़ा शिक्षक यांनी अभिनंदन केले.