वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ म्हणून निवड
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
येथील रहिवाशी डॉ.नेहा बापूराव देवरे-मोरकर यांची वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ म्हणून निवड झाली आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची निवड झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील मुख्याध्यापक बापूराव देवरे यांच्या त्या कन्या आहेत. ‘जेता’ क्लासेसचे संचालक दीपकसिंग मोरकर आणि शोभना मोरकर यांच्या त्या स्नुषा आहेत.
पती पोलीस उपनिरीक्षक विक्रांत मोरकर तसेच डॉ.श्रीकांत मोरकर, डॉ. मनीषा मोरकर यांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेने यश मिळाल्याचे नेहा देवरे- मोरकर यांनी सांगितले.