साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी. आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे डॉ.कलाम यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. निबंध स्पर्धेत ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख आय.आर.महाजन यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली. निबंध स्पर्धेत प्रथम श्वेता गौतम बैसाणे (इयत्ता दहावी), द्वितीय गिरीजा सुनील माळी (आठवी), तृतीय-रागिणी विनायक पाटील (नववी), उत्तेजनार्थ-वैष्णवी भरत पाटील (आठवी), वैष्णवी श्याम पाटील (आठवी), मयुरी आधार महाजन (नववी) अशा बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून मराठीचे शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले. यशस्वीतेसाठी शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजीराव पाटील, गुरूदास पाटील यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन आय.आर.महाजन तर आभार एस.के.महाजन यांनी केले.