जळगावात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया राठोड देणार सेवा

0
34

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

पुण्यातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया राठोड ह्या लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांची नियुक्ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात केली आहे. त्यांच्या अनुभवाचा निश्‍चितच रूग्णांना फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. दररोज सकाळी ९ ते ५ या वेळेत त्या रूग्णालयात स्त्रीरोग विभागात उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.

डॉ. प्रिया राठोड या मूळच्या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. त्यांनी शासकीय महाविद्यालयातून एबीबीएस पूर्ण केल्यावर बी.जे. मेडीकल कॉलेज, पुणे येथून एम.एस.पदविका प्राप्त केली आहे. त्याचबरोबर मेडीसिटी गुरगाव, दिल्ली येथून फेलोशिप आणि डिप्लोमा इन लेप्रोस्कोपी आणि फेलोशिप इन डायग्नोस्टिक आणि ऑपरेटिव्ह हिस्टेरोस्कोपी प्राप्त केली आहे. त्यांनी आतंरराष्ट्रीय जर्नल संशोधन प्रसिध्द केले आहे. व्हीएनएमसी यवतमाळ, लक्ष हॉस्पीटल, भंडारा येथे विविध पदावर काम करण्याचा अनुभव आहे. दुर्बिणद्वारा शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी आतापर्यंत २५००च्यावर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याचबरोबर सिझेरीयन, नॉर्मल प्रसुती करतांना त्यांनी अनेक गर्भवती महिला व बाळांना जीवदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here